Smriti Irani – सोलापूरात कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा भाजप आणि स्मृती इराणीं विरोधात शिमगा

Smriti Irani | सोलापूर |  टीम महाराष्ट्र देशा– केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपये व व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ३५० रुपये असा प्रचंड दरवाढ केली आहे. याच्या निषेधार्थ सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापुर येथे स्मृती ईरानी यांचे मास्क घालुन कुठे गेल्या स्मृती ईरानी, आज त्याच स्मृती ईरानी असत्या तर बाराशे दर ऐकून वेड्याच झाले असत्या म्हणत निर्दर्शने आंदोलन करण्यात आली.

यावेळी प्रतीकात्मक स्वरुपात महिलांनी काँग्रेसच्या काळात गॅस सिलेंडरचे दर तीनशे रुपये असताना रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या स्मृती ईरानींचे मास्क घालुन, आज त्याच पूर्वीच्या स्मृती ईरानी असत्या तर मोदींनी दरवाढ केलेल्या गॅस सिलेंडरचा बाराशेचा दर ऐकुन वेडे होऊन नाचले असते असे म्हणत प्रतीकात्मक पथनाट्य सादर केले. मोदी सरकारच्या विरोधात गॅस सिलेंडरचे दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, अब की बार पाकिटमार सरकार, भाग गई रे भाग गई स्मृती ईरानी भाग गई, चौकीदार चोर है अदानी का यार है, गॅस दरवाढ करून अदानीची नुकसान भरपाई करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, दरवाढ कमी झालेच पाहिजे, अश्या जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दणानुन गेला.

यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने आधीच प्रचंड महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला आज एक जबरदस्त झटका दिला. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपये व व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ३५० रुपये असा प्रचंड दरवाढ करुन देशातील जनतेच्या खिश्यावर दारोडा टाकला आहे. आपल्या उद्योगपती अदानी आणि इतरांचे लाखो कोटी कर्जे माफ करून त्यांची वसूली गॅस, पेट्रोल, डीझेल, महागाई करून देशातील जनतेकडुन वसुल करत आहे. तसेच उद्योगपती अदानीचे झालेल्या नुकसानीचे भरपाई दरवाढ करून करत आहेत. जनतेला पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ या मोदी सरकारने आणली आहे. म्हणून आज रोजी गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात, महागाई विरोधात, जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी, भाजपा आणि स्मृती ईरानी यांनी काँग्रेसच्या काळात केलेल्या आंदोलनाची आठवण करुण देण्यासाठी, गॅस सिलेंडरचे दरवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी भाजपा नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांचे मुखवटे घालुन निदर्शने आंदोलन केले.

मोदी सरकारचा निषेध करत घोषणाबाजी

मोदी सरकार हाय हाय…,भाग गई रे भाग गई, स्मृती इराणी भाग गई.., मोदी सरकार की तानाशाही नही चलेगी, अशा घोषणा देत स्मृती इराणी यांच्या नावाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिमगा केला. यावेळी महिला काँग्रेस कार्यकर्त्या स्मृती इराणी यांचा मुखवटा घालून हातामध्ये प्रतीकात्मक गॅस सिलेंडर घेऊन वेड्यासारखे नाचल्याचे दिसून आले.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.