InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

स्मृती इराणी राजीव गांधीचे ‘ते’ स्वप्न पूर्ण करणार

- Advertisement -

उत्तर प्रदेशमधील अमेठी लोकसभा मतदारसंघावर नेहमी गांधी घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे अमेठी ते सुलतानपूर रेल्वेमार्गाने जोडण्याचे स्वप्न होते. परंतु ते स्वप्न अर्पूणच राहिले.

ते काम आता पूर्ण करण्याचा निर्धार अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल आणि इराणी यांच्या बैठकीनंतर या प्रलंबित प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. ३४.३६ किलोमीटर लांबीच्या या मार्गात ३७ गावे येणार असून, सर्व्हेचे कामही पूर्ण झाले आहे.

- Advertisement -

खासदार राहुल गांधी यांनी या रेल्वेमार्गाचे 2013 मध्ये भूमिपूजनही केले होते. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही. सुलतानपूरमधील दिखौली, धम्मौर आणि अमेठीमधील पिंडोरिया या मार्गावर रेल्वे स्थानके उभारण्यात येणार आहेत. या रेल्वेमार्गामुळे रायबरेली, बाराबंकी आणि अयोध्या ही महत्वाची शहरे एकमेकांशी जोडली जाणार आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.