‘मेक इन इंडिया’मध्ये तयार झाल्या स्वदेशी स्नाइपर रायफल्स

शस्त्र उत्पादन कंपनीने देशातील पहिल्या स्वदेशी रायफलचा नमुना तयार केला आहे. राजधानी बंगळुरुस्थित कंपनी SSS डिफेन्सने हा नमुना तयार केला आहे. कंपनीने दोन स्नाइपर रायफल्स तयार केली आहेत.

देशातील पहिली स्वदेशी रायफल्स बनवणारी कंपनी SSS डिफेन्सचे व्यवस्थापकीय संचालक सतीश आर मचानी यांनी सांगितले की, आम्ही डिफेन्स सेक्टरमध्ये ‘मेक इन इंडिया’ आल्यानंतर या रायफल्स डिझाइन आणि तयार करण्यास सुरुवात केली. देशात शस्त्रे तयार करण्यास परवानगी असलेल्या काही उत्पादक कंपन्यांपैकी SSS ही एक कंपनी असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या सुरक्षा दलांसाठी एक संपूर्ण शस्त्र प्रणाली विकसित करणे हा कंपनीचा उद्देश असल्याचे मचानी यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शस्त्रे तयार करण्यासाठी आपल्याला आणखी काम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.