Snowfall Destination | कोणत्या हिल स्टेशनवर कधी सुरू होतो स्नो फॉल?, जाणून घ्या

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये फिरण्यासाठी (Travel) सर्वोत्तम वातावरण असते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये हिमवर्षाव (Snowfall) बघण्यासाठी बाहेर पडत असतात. लोक हिवाळ्यामध्ये कुटुंबासोबत बर्फाच्या ठिकाणी वेळ घालवायला जातात. त्याचबरोबर जोडपे देखील या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडतात. तुम्ही पण या हिवाळ्यात बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी कुठे जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कोणत्या ठिकाणी कधी पर्यंत बर्फवृष्टीचा सुरू असेल याबद्दल माहिती सांगणार आहोत.

मनाली

हिमाचल प्रदेश मधील मनाली हे शहर भारतातील लोकांचे आवडते हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. मनाली मध्ये ऑक्टोबर ते मार्च दरम्यान बर्फवृष्टी होते. या महिन्यात तुम्हाला मनाली मध्ये सर्वोत्कृष्ट निसर्गाचे नजारे बघायला मिळतील. त्याचबरोबर इथे तुम्हाला अनेक एडवेंचरस ऍक्टिव्हिटीचा देखील आनंद घेता येऊ शकतो.

गुलमर्ग

भारतातील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये गुलमर्ग शहर स्थित आहे. हे ठिकाण भारतातील सर्वोत्तम हिमवर्षासाठी ओळखले जाते. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान येथे बर्फवृष्टी होते. त्यामुळे या सहा महिन्यात तुम्ही गुलमर्गला जाण्याची योजना आखू शकता.

औली

भारतातील उत्तराखंड राज्यांमधील छोटे आणि सर्वात सुंदर हिल स्टेशन म्हणून औली या ठिकाणाची ओळख आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान येथे तुम्हाला सर्वोत्तम बर्फवृष्टीचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर इथे तुम्हाला स्नो बोर्डिंगचा देखील आनंद घेता येऊ शकतो.

शिमला

डिसेंबर ते जानेवारी दरम्यान तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा प्लान आखात असाल तर तुम्ही शिमल्याला जाण्याचा प्लॅन करू शकता. कारण शिमला मध्ये या महिन्यादरम्यान बर्फवृष्टी होते. त्यामुळे येथे तुम्हाला निसर्गाचे अनोखे नजरे देखील बघायला मिळतील.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.