“…म्हणून शिवसेनेतून एक टपरीवाला आज मंत्री होऊ शकतो”

सोलापूर : २०१९ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून युती तुटली. भाजपसोबतची युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना सोबत घेत सत्ता स्थापन केली. मात्र युती तुटल्यापासून शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर आगपाखड करताना दिसत आहेत.

यातच आता शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. राजकारणी हे खरे नटसम्राट असतात. राजकारण्यांना सर्व प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. शिवसेनेमध्ये नेहमीच सामाजिक कामांना नेहमीच प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच शिवसेनेच्या माध्यमातून आज एक टपरीवाला मंत्री होतो. असं पाटील म्हणाले.

राजकारणात कोणाला पाणी पाजायचे असेल तर आपल्याकडे पाणी असावे लागते, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. सध्या गुलाबराव पाटील सोलापूर जिल्याच्या दौऱ्यावर आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा