… तर सरकारमधून बाहेर पडा; बच्चू कडूंना सत्तारांचा सल्ला

आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी स्वतः सहभागी असलेल्या सरकारवरही ताशेरे ओढण्यात कसर सोडली नाही. शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, ते अगणित आहे. त्यामुळे दोन लाखापर्यंत शेतकरी कर्जमाफी हे बुजगावणं असल्याचं बच्चू कडू म्हणाले होते.

कर्जमाफी योजनेत बँका पैशावर डल्ला मारतील; सुभाष देशमुख यांचा आरोप

सरकारची कर्जमाफी बच्चू कडू यांना बुजगावणं वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावं, असा सल्ला राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Loading...

‘2 लाख कर्जमुक्त होणार, पण सातबारा कोराचं काय?’; फडणवीसांचा हल्लाबोल

कर्जमाफीचा हा पहिला टप्पा असून मराठवाडा, विदर्भातील ८० टक्के शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सरकारकडे पैसा येईल तशी आणखी कर्जमाफी केली जाईल, असं उत्तर अब्दुल सत्तार यांनी दिलं.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.