‘…त्यामुळे मी समाधानी आहे’; जिया खान आत्महत्या प्रकरणी सुरज पांचोलीची प्रतिक्रिया

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाची सुनावणी सीबीआय कोर्टातून सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. ही सुनावणी तब्बल आठ वर्षांनंतर होणार आहे. यावर या प्रकरणातील संशयीत आरोपी अभिनेता सुरज पांचोलीनं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जियाच्या मृत्युनंतर सीबीआयच्या कोर्टात जेव्हा हे प्रकरणं गेलं तेव्हा मी समाधानी झालो. असं सुरजने सांगितलं आहे. “गेली आठ वर्षे ही माझ्यासाठी खूप त्रासदायक गेली आहे. त्या आठ वर्षात मी खूप काही सहन केले आहे. त्यावेळी माझ्या नैराश्यातून मला बाहेर काढण्यासाठी घरच्यांची खूप मदत झाली आहे. जियाची आत्महत्या मलाही धक्कादायक होती. त्याचा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला. मात्र तपासातून खरं काय हे समोर येईल. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या वेळेस माझ्या वाट्याला आलेलं हे संकट खूप यातना देणारं होतं.”

पुढे प्रतिक्रिया देत सुरज म्हणाला की, “बॉलीवूडमध्ये माझं नाव अशा प्रकारानं खराब झालं. माझी प्रतिमा सुधारण्यासाठी मला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत आहे. तपासातून खरं काय हे समोर येईल. आता मला थोडा दिलासा मिळाला आहे. हे सांगायला हवं. मला सुरुवातीपासूनचं असं वाटतं होतं की, हे प्रकरण सीबीआय कोर्टात जायला हवं.” असं तो म्हंटला आहे.

अभिनेत्री जिया खाननं आपल्या राहत्या घरी 3 जुन 2013 रोजी आत्महत्या केली होती. त्यावरुन बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. जियाच्या घरच्यांनी या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेऊन आदित्य पांचोली यांचा मुलगा सुरज पांचोली याच्यावर आरोप केले. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्या तक्रारीमध्ये करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा