‘…म्हणून मी इंडियन आयडॉल शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत नाही’ : सोनू निगम

मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक सोनु निगम काही दिवसांपासून रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल’वर आपले मत व्यक्त करत आहे. एकेकाळी सोनू निगमने देखील इंडियन आयडल शोचे परिक्षक म्हणून काम केले आहे. मात्र त्यानं आपण गेल्या काही वर्षांपासून या शोचं परीक्षक होणं टाळलं आहे. याचं कारण सांगितलं आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इंडियन आयडल या शो विषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त केल्या जात आहे. त्यातच सोनुनं काही दिवसांपूर्वी एक प्रतिक्रिया दिली होती. त्यात त्यानं म्हटलं होतं की, ‘दरवेळी स्पर्धकांचं कौतूक करणं हे शक्य नाही. त्यांच्यावर टीकाही होत असते. त्याचा त्यांनी स्वीकार करायला हवा. जर परिक्षकांनी त्यांना त्यांच्या चूका सांगितल्याच नाही तर ते कसे गातात हे त्यांना कळणार नाही.’ असं सोनुने त्याचे मत मांडले होते.

यानंतर शोमध्ये जजची भूमिका न करण्याचे कारण सांगताना त्याने म्हटलं आहे की, “मी काय बोलावं आणि काय बोलु नये हे आता लोकं ठरवणार आहे का, मी ज्या संगीताच्या विश्वातून आलो आहे त्याविषयी मला काहीच माहिती नाही का, तेव्हा अनेकजण मला कसे वागायचे याचा सल्ला देतात हे पाहून वाईट वाटते. त्यामुळे आता मला त्या शोमध्ये परिक्षकाची भूमिका करण्यात काहीही रस नसल्याचं त्यानं सांगितलं आहे’. दरम्यान सोनु सध्या एका बंगाली सिंगिंग शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा