…म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटलांना दिली ‘नवरत्न तेलाची बाटली’ गिफ्ट!

मुंबई : भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमी टीकेची जुगलबंदी सुरू असते. यात कधी-कधी अतिरेक होतो. चंद्रकांत पाटील यांच्याकडून असेच झाले. शरद पवारांवर टीका करताना ते म्हणालेत ‘राज्यात शरद पवारच आम्हाला आव्हान नाही. कारण ५४ आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळ आयुष्य गेल, कधी ६० वर तो गेला नाही.’

तसेच, चंद्रकांत पाटलांनी पवारांचा एकेरी उल्लेख केल्याने राष्ट्रवादीचे नेते संतापलेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पाटलांना उत्तर दिले. मात्र या वक्तव्याचा निषेध करत पुण्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना थेट नवरत्न तेल डोक्याला लावण्यासाठी पाठवलं आहे.

आपण कुणाबद्दल बोलतो, आपली तेवढी उंची आहे का, बोलताना जरा डोकं शांत ठेवून टीका करत जा, म्हणून हे नवरत्न तेल तुमचं डोकं शांत करण्यासाठी पाठवत आहे. आणि तरीही तुमचं डोकं शांत नाही झालं तर, त्याचा इलाज मी स्वखर्चाने करतो, असा इशाराच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने दिला आहे. संदीप काळे असं या कार्यकर्त्यांचं नाव आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा