…म्हणून उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजे भावूक, डोळ्यात अश्रू तरळले

मुंबई : गेले तीन दिवस खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले उपोषणाला बसले आहेत. आजच्या तिसऱ्या दिवशी संभाजी राजे यांची प्रकृती बिघडली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यांचा चेहरा सुकलेला दिसत असून चेहऱ्यावर थकवा जाणवत आहे. मात्र, सरकारकडून अजूनही कोणतंही ठोस आश्वासन देण्यात आलेलं नाही. तसेच आज त्यांनी तब्बल 12 मिनिटे 28 सेकंद कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं.

यावेळी बोलत असताना त्यांचा आवाज क्षीण झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर बोलत असताना अचानक त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यामुळे त्यांनी तात्काळ हाताने डोळे पुसण्यास सुरुवात केली. अनपेक्षितपणे घडलेला हा प्रसंग पाहून आझाद मैदानात जमलेले शेकडो कार्यकर्तेही हेलावून गेले. राजेंच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून संपूर्ण परिसरात शांतता पसरली होती. कार्यकर्तेही गहिवरून गेले होते.

आज वारकरी संप्रदायाने संभाजी राजेंना भेट दिली होती. यावेळी त्यांच्याबद्दल बोलताना पुढे मी मनापासून आपला ऋणी आहे. छत्रपती केव्हा रडत नाहीत (हे वाक्य बोलत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते) पण छत्रपतींच्या डोळ्यात केव्हा अश्रू नसतात. तुमची भक्ती आणि आमची शक्ती यांने स्वराज निर्माण होतं. आपण तेच स्वराज निर्माण करण्यासाठी आलात, तुम्हा सर्वाचं आभार, असं संभाजी राजे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा