… म्हणून माझ्यासारख्या इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे करणं टाळायला हवेत

मुंबई : राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि इतर भागात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय नेते पूरग्रस्त भागांना भेट देत आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणालेत मदतकार्यात गुंतलेल्या यंत्रणेवर ताण पडू नये म्हणून राजकीय नेत्यांनी सध्याच पूरग्रस्त भागांचे दौरे टाळावेत.

पत्रपरिषदेत पवार म्हणालेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचे मी स्वागत करतो. कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होते म्हणून माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवे, असे मला वाटते.

मी लातूरला असताना आम्ही सर्वजण कामात होतो. त्यावेळी पंतप्रधान लातूरमध्ये येत होते. मी पंतप्रधानांना सांगितलं की, किमान 10 दिवस तरी येऊ नका. तुम्ही आलात तर सर्व यंत्रणा तिकडे लावावी लागेल. त्यांनी लगेच माझी विनंती मान्य केली. ते 10 दिवसानंतर आले. मी सुद्धा दौऱ्यावर जात नाही. त्यामुळे सगळी यंत्रणा फिरवावी लागते, असं शरद पवारांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा