.. तर पवारसाहेबांचे महाराष्ट्रमध्ये महत्त्व असते; निलेश राणेंची घणाघाती टीका

मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खूप वेगवेगळ्या गोष्टी अखंड महाराष्ट्राने पहिल्या. या निवडणुकीत केंद्रस्थानी होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. २०१९ ला शरद पवार स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. यावेळी या सर्व निवडणुकीचा टर्निग पॉईंट ठरला ती साताऱ्यातील पवारांची पावसातील सभा.

सातारा येथे श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार स्टेजवर भाषण करायला गेले असता तिथे जोरदार पाऊस आला होता. पाऊस सुरू असताना शरद पवारांनी भाषण केलं होतं. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हा चर्चेचा विषय बनला. तसेच या सभेनंतर अनेक राजकीय गणिते फिरली. पवारांच्या सभेला दोन वर्षे पूर्ण झाल्याने पुन्हा सोशल मीडियावर या सभेच्या चर्चा रंगल्या आहेत.

मात्र यावरून निलेश राणे यांनी ट्विट करून पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. राणे म्हणाले की, काय झालं जर पवारसाहेबांच्या पावसाच्या सभेला दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षांत महाराष्ट्र किती वर्षे मागे गेला हे पण सांगा, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काय मिळालं? महाराष्ट्र १ नंबर फक्त कोरोनामध्ये, असे असंख्य विषय हाताळले असते तर पवारसाहेबांचे महाराष्ट्रमध्ये महत्त्व असते, अशी टीका राणे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा