InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

…..म्हणून सुबोध म्हणतोय, तो एक निर्णय खूप महत्त्वाचा…..

अभिनेता सुबोध भावे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. नुकताच त्याचा ‘आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफीसवर त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यासोबतच झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही त्याची मालिकासुद्धा छोट्या पडद्यावर गाजतेय. याव्यतिरिक्त सुबोध आणखी एक नवा चित्रपट तुमच्या भेटीला घेऊन येत आहे. सोशल मीडियावर त्याने या चित्रपटाची घोषणा केली आहे.

‘एक निर्णय’ असं या चित्रपटाचं नाव असून याचा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक श्रीरंग देशमुख आहे. तो एक निर्णय खूप महत्त्वाचा असतो, असं सुबोधने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता श्रीरंग देशमुख दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.  ‘एक निर्णय’ हा चित्रपट कौटुंबिक कथानकावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. १८ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply