‘…म्हणून अयोध्या दौरा स्थगित केला’; राज ठाकरेंनी सांगितलं कारण

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा 5 जून रोजी होणार अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी स्वत: ट्विट करत तूर्तास दौरा स्थगित केल्याची माहिती दिली होती. यानंतर महाविकासाआघाडीतील नेत्यांनी राज ठाकरे आणि मनसेवर जोरदार हल्लाबोल केला होता. यानंतर आज पुण्यात राज ठाकरे यांची सभा पार पडली.
या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होत. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचा लक्ष लागलं होत. राज ठाकरे यांची पुण्यातील गणेश कला क्रिडा मंच येथे जाहीर सभा झाली. त्यातच आता राज ठाकरे यांनी सभेत बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी अयोध्या रद्द का केला याच देखील कारण सांगितलं.
राज ठाकरे म्हणाले कि, तुमच्यावर केसेस नको म्हणून मी अयोध्या दौरा रद्द केला, मला माझी पोरं हाकनाक जाऊ द्यायची नव्हती, असं ठाकरेंनी सांगितलं आहे. बारा तेरा वर्षानंतर माफी मागण्याची आठवण झाली. हे सगळे आतून एक आहे. मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा हे मुद्दे अनेकांना रूचले नाहीत. नवनीत राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायला गेले. मातोश्री काय मशिद आहे का?, असा सवालही राज ठाकरेंनी केला.
महत्वाच्या बातम्या
- निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करा; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला!
- “संजय राऊतांमध्ये कादर खान घुसलाय”; मनसे नेते गजानन काळेंचा निशाणा!
- दाऊदशी संबंधित मंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांनी काम करावे, ही लाजिरवाणी बाब; देवेंद्र फडणवीसांची टीका
- नवाब मालिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गॅंगशी संबंध आहेत का?; सोमय्यांचा सवाल