…म्हणून ‘त्या’ दोघांनी बाईकवर केला घोडागाडीचा पाठलाग

पुण्याच्या रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या घोडागाडीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वायुवेगानं धावणाऱ्या घोडागाडीमागे बाईकस्वार फरपटत गेले यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. पुण्यातल्या येरवडा पुलावर शुक्रवारी ही घटना घडली.

त्याचं झालं असं की, घोडागाडीच्या मागे बाईकवरून पळणारी ही व्यक्ती त्याच घोडागाडीची मालक आहे. घोडे अचानक उधळले आणि रस्त्यावरून सुसाट धावत सुटले. त्यानंतर या चालकानं मागून येणाऱ्या बाईकवाल्याकडे लिफ्ट मागितली आणि घोडागाडीचा  पाठलाग केला.

मात्र घडलेल्या ह्या प्रकारात चालक गंभीररित्या जखमी झाले आहे.  सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मनसेचे माजी नगरसेवक बाबू वागस्कर यांनी या घटनेचा उलगडा केला. मात्र, सुदैवानं रस्त्यावर फारसं कुणी नसल्यामुळे होणारा अपघात टळला. तसंच इथून काही अंतरावर पेट्रोल पंप असल्यामुळे मोठा अनर्थ होण्याचा धोका होता तोही टळला.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.