InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

….त्यामुळे विधान परिषदेतही विरोधी पक्षनेताच नसेल- सुरेश धस

- Advertisement -

जगमित्र साखर कारखानप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश  दिले असूनदेखील आमदार सुरेश धस यांनी मुंडेविरोधात वक्त्व्य केले आहे.

- Advertisement -

गुन्हा दाखल होताच धनंजय मुंडे फरार होतील, असे बोलत त्यांनी मुंडे यांना चिमटा काढला आहे.

धस यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना मुंडे यांच्यावर टीका केली. “यंदाचे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे गुन्हा दाखल होताच फरार होतील. त्यामुळे विधान परिषदेतही विरोधी पक्षनेताच नसेल”, असे त्यांनी सांगितले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.