… म्हणून विराटने स्वत:हून राजीनामा दिला, सुनील गावस्करांनी केला खुलासा

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल जाहीर केले होते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 विश्वचषक क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवून ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपली होती. यानंतर आज विराट कोहलीने आणखीन एक मोठा निर्णय घेतला आहे.

विराट कोहली भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने आपला निर्णय जाहीर केला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आज शनिवारी संध्याकाळी विराटने ट्विटरवरून कसोटी कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली. एक संदेश देताना त्याने संघाच्या कर्णधारपदाची संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानले.

यानंतर विराटच्या राजीनाम्यावर भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेगळी प्रतिक्रिया दिलीय. मला विराटच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. सामना संपल्यानंतरच्या “प्रेझेंटेशन सेरेमनी”मध्येच तो राजीनामा देईल, असे मला वाटले होते. पण, तेव्हा त्यांने हा निर्णय जाहीर केला असता तर कुठल्यातरी रागातून हा निर्णय घेतला, असा संदेश गेला असता. त्यामुळे विराट २४ तास थांबला व त्यानंतर त्याने हा निर्णय जाहीर केला.

विराट यशस्वी कर्णाधर होता, तरी त्याने राजीनामा का दिला? या प्रश्नाच्या उत्तरात गावस्कर म्हणालेत की, परदेशात मालिका हरणे हे बोर्ड आणि क्रिकेट चाहते या दोघांकडूनही सहज स्वीकारले जात नाही. परदेशात मालिका गमावल्यानंतर कर्णधाराला पदावरुन हटवण्याचा धोका असतो. आधीही हे घडले आहे, आताही असे घडू शकले असते. कर्णधारपदावरुन आपल्याला हटवले जाईल, हा अंदाज विराटने बांधला असावा म्हणून त्याने स्वत:हून राजीनामा दिला.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा