‘…तर आमचा उमेदवार हरला तरी आम्हाला पर्वा नाही’; देवेंद्र फडणवीसांंचं मोठं वक्तव्य

मुंबई : राज्यात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्यपदाच्या 200 जागांसाठीच्या पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात मतदान होणार आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. निवडणुकांवरून फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलत होते.

“निवडणुकांच्या विरोधात आम्ही आंदोलन तर करणारच आहोत. पण तरीही या सरकारचा जर निवडणुका लढवण्याचा डावच असेल तर भाजप या सगळ्या जागांवर फक्त ओबीसी उमेदवार लढवेल. जिंकलो, हरलो तरी आम्हाला पर्वा नाही,” असं देेवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“आम्ही या जागा ओबीसींसाठी आरक्षित आहेत असं समजून ओबीसी उमेदवार लढवू. जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भाजप शांत बसणार नाही,” असा इशारा फडणवीसांनी सरकारला इशारा दिला आहे.

“माझं आव्हान आहे, सरकारमधील ओबीसीच्या मंत्र्यांना आव्हान आहे, राज्य सरकारला अधिकार आहे, या मंत्र्यांनी राज्य सरकारला निवडणुका पुढे घ्यायला भाग पाडा,” असंही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा