Social Media | धक्कादायक! मामानं मुलगी देण्यास नकार दिल्यानं भाच्यानं केलं सोशल मीडियावर ‘हे’ कांड

Social Media | सिल्लोड: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात काही लोक सोशल मीडियाचा गैरवापर करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती चुकीचे फोटो व्हायरल केले जातात. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात घडला आहे. मामांनं भाच्याला मुलगी देण्यास नकार दिल्यानंतर भाच्यानं मुलीचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले आहे.

The young man asked the girl for marriage

सिल्लोड तालुक्यात घडलेल्या या घटनेमध्ये मामाच्या मुलीवर त्या तरुणाचं  जीवापाड प्रेम होतं. त्यामुळे त्या तरुणाने मुलीला लग्नाची मागणी घातली. मुलीला आणखी शिकवायचं आहे, त्यामुळे लग्नाचं नंतर बघू असं म्हणत मामानं  त्या तरुणाला नकार दिला. मामांनी नकार दिल्यानंतर तरुणानं रागात येऊन मुलीचे फोटो एडिट करून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करायला सुरुवात केली.

मामानं वारंवार भाच्याला समजून सांगितल्यानंतरही त्यानं ते डिलीट केले नाही. उलट मामानं समजून सांगितल्यानंतर भाचा आणखी चिडला आणि त्याची विकृती आणखी बिघडली. भाच्यानं मुलीचे फोटो एडिट करून आक्षेपार्य पद्धतीने व्हिडिओ तयार करून व्हाट्सअप आणि सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केले.

या घटनेनंतर मामानं भाच्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रागात असलेल्या भाच्यांनं हा प्रकार (Social Media) सुरूच ठेवला. त्यानंतर मामानं त्याच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकाराचा तपास करून भाच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर सिल्लोड परिसरात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3CdUqmj