Social Media Update | सोशल मीडियाला आता केंद्र सरकारचा आळा, तयार केले नवीन IT नियम

टीम महाराष्ट्र देशा: आजकालच्या तंत्रज्ञानाचे युगामध्ये सोशल मीडिया Social Media हे सर्वात मोठे कनेक्टिंग प्लॅटफॉर्म Platform बनले आहे. दरम्यान, सोशल मीडिया दररोज काही ना काही अपडेट Upadte घेऊन येत असते. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची ही मनमानी रोखण्यासाठी केंद्र सरकारने आयटी IT नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या नवीन आयटी नियमानंतर ट्विटर Twitter, फेसबुक Facebook, इंस्टाग्राम Instagram आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म साठी भारतातील नवीन आयटी नियम अनिवार्य होणार आहेत. त्यामुळे आता कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला अल्गोरिदमच्या नावाखाली काहीही अपडेट करता येणार नाही.

नवीन आयटी नियमांच्या नोटिफिकेशनसाठी 90 दिवसात अपीलेट पॅनल (Grievance Appellate Panel) तयार करण्यात येणार आहे. या नवीन बदलाअंतर्गत संवेद्यशील कंटेंट वर आता 24 तासाच्या आत कारवाई करण्यात येईल.

सरकारने जारी केलेले नवीन सोशल मीडिया आयटी रुल्स Social Media IT Rules

  • सरकारने जारी केलेल्या नवीन नियमानुसार, सोशल मीडिया कंपनींना त्यांच्या सेवा नियम आणि गोपनीयतेबद्दल अधिक माहिती मोबाईल ॲप्लिकेशन सह वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध करून द्यावी लागेल.
  • सोशल मीडिया कंपन्यांना आता भारतीय संविधानात नमूद केलेल्या नागरी हक्कांचा आदर करणे अनिवार्य आहे.
  • कंपनी बद्दल कुठलीही तक्रारीच्या निवारणासाठी 72 तासांचा अवधी दिला जाईल. त्याचबरोबर मजकूर काढून टाकण्यासाठी कंपनीकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर 72 तासांच्या आत कारवाई केली जाईल.
  • नवीन नियमानुसार कोणत्याही तक्रारीवर कंपनीला पंधरा दिवसाच्या आत ॲक्शन घेणे अनिवार्य आहे.

या नवीन आयटी नियमांमध्ये वापरकर्त्यांच्या अधिकारांबाबत काळजी घेऊन नियम निश्चित करण्यात आले आहे. नवीन नियमावलीनुसार, सर्व टेक कंपन्यांना भारतीय संविधानाचे पालन करावेच लागणार आहे. त्याचबरोबर युजरच्या तक्रारींची दखल 24 तासाच्या आत घेणे अनिवार्य आहे. शिवाय यासाठी शासन आपली नवीन समिती देखील स्थापन करणार आहे. या समितीमध्ये केंद्र सरकारच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.