सोलापुरातून प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे पिछाडीवर

सोलापुर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे पिछाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार सिध्देश्वर स्वामी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळी आकरा वाजेपर्यंतच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार सिध्देश्वर स्वामी 113194 मते, काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे 82569 मते आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार 32272 मतांवर आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत देखील सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र यंदा प्रकाश आंबेडकर यांनी अकोला मतदारसंघाबरोबरच सोलापूरातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने ही लढत चुरशीची झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.