Soler Eclipse | सूर्यग्रहण संबंधित आजही ‘हे’ समज आहेत कायम

टीम महाराष्ट्र देशा: आज 25 ऑक्टोबर 2022 रोजी भारताच्या India बहुतांश भागांमध्ये खंडग्राम सूर्यग्रहण Soler Eclipse दिसणार आहे. आज या वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण पार पडणार आहे. त्यामुळे देशातील लोक या सूर्यग्रहणाच्या तयारीत व्यस्त आहे. भारतामध्ये आज हे खंडग्रास सुर्याग्रहण संध्याकाळी 4 वाजून 22 मिनिटांनी सुरू होऊन सूर्यास्ताच्या वेळेस 6 वाजून 32 मिनिटांनी संपणार आहे. आज घडणारे हे खंडग्रास सूर्यग्रहण ग्रहणचक्र 124 क्रमांकाचे आहे.

पुरातन काळापासूनच भारतात सूर्यग्रहणादरम्यान, अनेक मान्यता आहेत. ग्रहणाविषयी अनेक मिथकांवर लोक विश्वास ठेवतात. सूर्यग्रहणा संबंधित आजही काही समज आहे, जे समाजात कायम आहे. जगामध्ये अशी काही ठिकाणी आहे जिथे ग्रहण कोणत्याही धोक्यापेक्षा कमी मानले जात नाही. यामध्ये अनेक ठिकाणी ग्रहण म्हणजे जगाचा अंत किंवा भयंकर उलथापाल तिचा इशारा आहे. अशी देखील मान्यता आहे. जोपर्यंत लोकांना ग्रहण काय आहे हे नक्की माहित नव्हतं तोपर्यंत त्याबद्दल अनेक श्रद्धा आणि अंधश्रद्धा  होत्या. आज जरी लोकांना ग्रहणा मागील वैज्ञानिक कारणे माहीत असले तरी काही श्रद्धा आणि अंधश्रद्धा आजही कायम आहेत.

सूर्यग्रहण Soler Eclipse दरम्यान वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळे समाज कायम आहेत

  • हिंदू पौराणिक कथेनुसार, राहू नावाचा राक्षस आणि त्याचे अलिप्त शरीर केतू नावाने ओळखले जाणारे, वेळोवेळी सूर्य आणि चंद्र यांना पकडतात आणि त्यांना घेऊन टाकतात असा समज आहे. आणि हे सूर्य आणि चंद्रग्रहण होण्यामागचे कारण आहे असे मान्यता पौराणिक कथांमध्ये आहे.
  • प्राचीन अझ्टेक लोकांचा असा विश्वास होता की, चंद्राचा एक छोटासा तुकडा कापला गेल्यामुळे चंद्रग्रहण होते. त्याचबरोबर मेक्सिको मध्ये देखील असेच एक अंधश्रद्धा होते की एखाद्या गर्भवती महिलेने ग्रहण पाहिले तर तिच्या जन्मलेल्या मुलाच्या चेहऱ्याचा तुकडा कापलेला असेल.
  • त्याचबरोबर पूर्वी लोकांना खगोलशास्त्र आणि खगोलशास्त्रीय हालचालींबद्दल वैज्ञानिक कारणे माहीत नव्हती. त्यामुळे त्यावेळी सर्वसाधारणपणे ग्रहणाला देवाचा किंवा निसर्गाचा कोप मानले जात असे.
  • चीनमध्ये प्राचीन काळी असा विश्वास होता की स्वर्गातील कुत्रा सूर्याला मिळण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून ग्रहण पार पडते.
  • तर दुसरीकडे पश्चिम आशियामध्ये असा गैरसमज होता की ग्रहणाच्या वेळी ड्रॅगन सूर्याला घेण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्या दिवशी तिकडे ड्रम वाजवल्या जात.
  • त्याचप्रमाणे दक्षिण पॅसिफिक प्रदेश आणि अमेरिकेच्या उत्तर पश्चिम किनारपट्टीवर राहणाऱ्या अमेरिकन लोकांचा असा विश्वास होता की, सूर्य आणि चंद्र हे दोघे प्रेमी असून ग्रहणाच्या वेळी ते पृथ्वीवर येऊन गुप्तपणे त्यांचे प्रेम साजरे करतात

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.