Solo Travel Tips | सोलो ट्रिप करायचा विचार करत असाल, तर ‘हे’ देश ठरू शकतात उत्तम पर्याय

Solo Travel Tips | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल सोलो ट्रीपचा ट्रेंड खूप वाढला आहे. विशेषतः मुलींमध्ये सोलो ट्रिपचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. सोशल मीडिया आणि चित्रपटांमुळे लोक सोलो ट्रॅव्हलकडे आकर्षित होताना दिसत आहे. पण अनेकदा अनेकजण भीती पोटी सोलो ट्रीपचे प्लॅन सोडून देतात. पण सोलो ट्रॅव्हलिंग हे खूप सुरक्षित असून त्यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळे अनुभव मिळतात. तुम्ही पण जर सोलो ट्रीप करण्याचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सोलो ट्रीपसाठी काही सर्वोत्तम ठिकाणांची नावं सांगणार आहोत. तुम्ही पुढील देशांमध्ये सोलो ट्रीपला जाऊ  शकतात.

नेदरलँड

सोलो ट्रिप करण्यासाठी नेदरलँड एक सर्वोत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी फिरणं तर सोपं आहे, पण इथे भाषेची ही कोणती अडचणी येत नाही. कारण या देशातील लोक खूप मनमिळाऊ आहे. नेदरलँडमध्ये फिरायला गेल्यावर तुम्ही होस्टेलमध्ये देखील राहू शकतात. एप्रिल महिना नेदरलँडला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना आहे. नेदरलँड हा देश सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील सर्वोत्तम आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही निवांत सोलो ट्रिपला जाऊ शकतात.

न्युझीलंड

एका अहवालानुसार, न्युझीलंड हा सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जगातील दुसऱ्या क्रमांकावर येणारा देश आहे. सोलो ट्रिपसाठी न्युझीलंड हे कोणत्या स्वर्गापेक्षा कमी नाही. दरवर्षी लाखो लोक येथे फिरायला जातात. या देशामध्ये पर्यटकांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात.

स्कॉटलंड

स्कॉटलंड हा देश पूर्णपणे निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. स्कॉटलंडसारखे सौंदर्य तुम्हाला क्वचितच इतर ठिकाणी बघायला मिळेल. सोलो ट्रिप करण्यासाठी स्कॉटलंड एक उत्तम पर्याय आहे. एकट्याने प्रवास करण्याच्या दृष्टीने हा देश एकदम सुरक्षित आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वोत्तम सोलो ट्रिपचा आनंद घेता येईल.

जपान

महिला प्रवाशांसाठी जपान हे जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जाते. त्यामुळे तुम्ही पण जर सोलो ट्रिप करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही जपानला भेट देऊ शकतात. कारण या ठिकाणी तुम्हाला अनेक सुंदर ठिकाणं बघायला मिळतील. जपानमध्ये बुलेट ट्रेन पासून ते आयर्लंड हॅपिंगपर्यंत बरेच काही बघण्यासारखे आहे.

महत्वाच्या बातम्या

 

You might also like

Comments are closed.