सोमय्या म्हणाले, जरंडेश्वरचा मालक कोण ते सांगा?; अजित पवारांनी कुंडलीच मांडली

पुणे : काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कारखाना घोटाळा प्रकरणी थेट साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याला भेट दिली होती. जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांशी चर्चा केल्यानंतर सोमय्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांना आव्हान दिलं होत. तुमच्यात हिंमत असेल तर कारखान्याचे मालक कोण जाहीर करावे असे सोमय्या यांनी म्हटलं होत.

यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारपरिषद घेऊन या कारखान्याची संपूर्ण कुंडलीच माध्यमांसमोर मांडत सोमय्यांच्या आरोपांवर उत्तर दिल आहे. ६५ साखर कारखाने महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विकले गेले तर काही चालवायला दिले गेले आहेत . तसेच ६४ सहकारी साखर कारखाने वेगवेगळ्या कंपनीने विकत घेतल्याची आकडेवारी त्यांनी माध्यमांसमोर मांडली.

तसेच पुढे हनुमंत गायकवाड यांनी जरंडेश्वर सुगर मिल काढली. त्यांचं कुटुंब त्यात होतं. त्यांना त्या वर्षी तोटा आला. त्यामुळे त्यांनी तो कारखाना दुसऱ्या कंपनीला चालवायला दिला. तो कारखाना दुसरी कंपनी चालवत आहेत. सुंदरबन कोऑपरेटीव्ह सोसायटी ही मुंबईतील सोसायटी आहे. त्यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी कोर्टाने जरंडेश्वरच्या लिलावाबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार यांनी कोणता कारखाना किती कोटीला विकला गेला आणि तो कुणी घेतला याची यादीच आज जाहीर केली. अनेक कारखाने स्वत: सरकारनेच 3 ते 5 कोटी विकल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून देत साखर कारखाने आम्ही मातीमोल भावाने विकले कसे म्हणता? असा सवालही केला. महाराष्ट्रातील साखर कारखानदारी बद्दल खूप काही बोललं गेलं. खूप बातम्या आल्या. या गोष्टीला 12 ते 15 वर्ष झाले या बातम्या येत असताना मी उत्तर देत नव्हतो.

पण अलीकडे आता अतिरेक झाला आहे म्हणून उत्तर देत आहे. त्याकाळात 25 हजार कोटी, काहींनी 10 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. त्यामुळे नवीन सरकार आलं त्यांनी सीआयडीला चौकशी करायला लावली. त्यात काही निष्पन्न झालं नाही. एसीबीने चौकशी केली. त्यातही स्पष्ट झालं नाही. सहकार विभागानेही चौकशी केली. त्यातही काही निष्पन्न झालं नाही, असं पवार यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा