सोमय्यांकडून ईडीकडे घोटाळ्याचे पुरावे सादर, हसन मुश्रीफ तातडीने शरद पवारांच्या भेटीला

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावले आहेत. मुश्रीफ यांनी केलेल्या १२७ कोटींच्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं होत. तसेच , फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे असल्याचं ते म्हणाले होते.

यानंतर आता या सगळ्या पार्शभूमीवर २७०० पानी पुरावे घेऊन ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहे. सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखानामध्ये कोट्यवधी रुपयांची बेनामी शेअर कॅपिटल भ्रष्टाचार झालेचे पुरावे घेऊन माजी खासदार किरीट सोमय्या ठरल्याप्रमाणे आज दुपारी ईडीच्या कार्यालयात पोहोचले. ईडीमधील ४ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक झाली. कागदोपत्री पुरावे दिले आहेत, अशी माहिती सोमय्यांनी दिली आहे.

यानंतर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमय्या यांनी केलेल आरोप आणि सत्य परिस्थिती काय आहे, यासंदर्भात माहिती हसन मुश्रीफ यांनी पवारांना दिली. मागील काही दिवसांपासून सोमय्या हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत सुटले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या आरोपांचा कशाप्रकारे सामना करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा