सोमय्या करणार महाराष्ट्राच्या राजकारणात भूंकंप; थेट अजित पवारांनाचं दिली गंभीर इशारा

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडीतील नेत्यांवरील भ्रष्ट्राचाराचे आरोप करत पुरावे मिळवण्यासाठी धाडसत्र सुरु केलंय. आज त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडचणीत आणणारा दावा केला आहे. शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री माझ्या रडारवर आल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

तसेच येत्या सोमवारी या दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार माध्यमांसमोर उघडे करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. मात्र, त्यांनी या दोन्ही नेत्यांची नवे उघड केलेली नाही. त्यामुळे हे दोन नेते कोण? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. या प्रकरणी सोमय्या यांनी पुणे दौरा करत पत्रकार परिषद घेऊन भावना गवळी यांच्यावरील आरोपाबाबत भाष्य केलं होतं.

त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काग्रेसचे नेते अजित पवारांनाही जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी गंभीर इशारा दिला आहे. अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्युएशनचे कागद लोकांसमोर का ठेवत नाहीत? ६५ कोटी रुपयांत कारखाना घेतला आणि ७०० कोटी रुपयांचं कर्ज घेतले आहे.

तसेच वैभव शिदे असं एका व्हॅल्युअरचं नाव आहे. शरद पवार यांना यासाठीच सहकार चळवळ हवी आहे का? असा सवालही सोमय्या यांनी केला आहे. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासूनच किरीट सोमय्या यांनी शिवसेनेतील नेत्यांविरोधात मोहीम चालू केली होती. अनिल परब, मिलिंद नार्वेकरांसह महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, तक्रारी दाखल करणं हे सुरूच होतं.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा