“सोमय्यांच्या आरोपात काहीच तथ्य नाही; ते फक्त राज्याला मनोरंजन देण्याचं काम करतात”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्र्यांवर केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा वापर करून कारवाई करण्यात येत आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री छगन भुजबळ, आमदार प्रताप सरनाईक अशा नेत्यांमागे सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशी आणि छाप्यांचे सत्र सुरु आहे.

यातच भाजपा नेते किरीट सोमय्या हे वेगवेगळ्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले किरीट सोमय्यांवर निशाणा साधलाय. किरीट सोमय्या आरोप लावण्यासाठी सुसाट सोडले आहेत. त्यांना काय बोलतो, काय नाही. कुठले पुरावे दाखवतो यात काही तथ्य नसते. ते केवळ राज्याला मनोरंजन देण्याचं काम करतात, असं टोला नाना पटोले यांनी किरीट सोमय्यांंना लगावला आहे.

दरम्यान, पहाटेला शपथ घेणारे सर्वांनाच ठाऊक आहेत. त्यांचे मंत्रिमंडळ झाले. त्यांचे 80 तासांचे सरकार हा महाराष्ट्रासाठी एक इतिहासच आहे. आता तर त्यांना दिवसादेखील स्वप्न पडायला लागलेत. ते सातत्याने दिल्लीला जाऊन पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटत असतात, असं म्हणत नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील फटकेबाजी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा