सोमय्यांचा पुन्हा महाविकास आघाडीला इशारा; माझ्या रडारवर आता विदर्भातील काँग्रेसचा मंत्री

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडीतील नेत्यांवरील भ्रष्ट्राचाराचे आरोप करत पुरावे मिळवण्यासाठी धाडसत्र सुरु केलंय. यावेळी त्यांनी आता पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडचणीत आणणारा दावा केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यानंतर आता सोमय्यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावलेत.

याआधी अनिल परब यांच्यावर किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले होते. त्या आरोपाला आता परब यांनी कायदेशीररित्या उत्तर देण्याची तयारी दाखवली आहे. सोमय्या यांनी माझ्यावर जे काही आरोप केले आहेत. त्या आरोपांचं पुराव्यासह स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा 72 तासात माफी मागावी, नाहीतर किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, अशी नोटीस अनिल परब यांच्या वकिलांनी किरीट सोमय्या यांना पाठवली आहे.

मंत्री अनिल परब यांच्या दाव्याला मी भीक घालत नाही. शिवसेनेला वाटत असेल की मी फक्त त्यांचेच घोटाळे बाहेर काढत आहे. पण, आता माझ्या रडारवर विदर्भातील काँग्रेसचा मंत्री आहे, असं सोमय्या म्हणाले आहेत. राज्यात मंत्र्यांचे कोट्यावधी रूपयांचे घोटाळे बाहेर काढणार आहेत. तसेच राष्ट्रवादीच्याही मंत्र्याचा घोटाळा बाहेर येणार आहे, असंही सोमय्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा