राज्यपालांच्या प्रामाणिक कामामुळे काहींना मळमळ : देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून खटके उडताना दिसतात. दोन दिवसांपुर्वी मंत्रिमंडळातील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राज्यापालांच्या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर नाराजी व्यक्त करत राज्यपालांवर टीका केली होती. यावरून आता राजकारण रंगाताना दिसत आहे. अशात विरोधी पक्षनेतेे देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“संविधानाप्रमाणे हे सगळे अधिकार राज्यपालांचे आहेत. राज्यपाल हे प्रमुख आहेत आणि संविधानाने त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाला सल्ला देण्यासाठी त्याठिकाणी तयार केलेलं आहे. त्यामुळे राज्यपालांना दौरे करु नका असं कोणी सांगू शकत नाही. पीसी अलेक्झांडर किंवा राज्यपाल जमीर यांनी तर महाराष्ट्राच्या एकेका जिल्ह्याचा दौरा केला आहे. मग त्यावेळी हे विषय का आले नाहीत.

हे राज्यपाल प्रामाणिकपणे आपलं काम करतायतं त्यामुळे काही लोकांना मळमळ होतेय. ती मळमळ याप्रकारे बाहेर निघतीय त्या लोकांना माझा सल्ला आहे. त्यांनी भारतीय संविधानाचं वाचन करावं आणि त्यानंतर अशी वक्तव्य करावी,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा