गल्लीच्या स्पर्धा जिंकल्यावर काही लोक वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न बघत आहेत; नवाब मलिकांचा राणेंवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग : जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात सुरू झालेला वाद अद्यापही संपलेला नाही. या निवडणुकीत भाजपा पॅनलने बाजी मारली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेत सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. आता पुन्हा त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे.

बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाल्यानंतर नारायण राणे माध्यमांशी बोलत होते. तसेच पुढे राणे म्हणाले, ११-७ ने आपण त्यांचा पराभव केला. जिल्ह्यात मोठमोठी लोक आली. खूप काही बोलले. ही लोक अक्कल सांगायला इथे आली होती. आज त्यांना अकलेचे धडे मिळाले असतील, असे राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक टोला लगावला होता.

यानंतर आता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केलाय. नवाब मलिक म्हणाले, “काही लोक गल्लीच्या स्पर्धा जिंकल्यावर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न बघत आहेत. पैशाची ताकद, गुंडगिरीच्या जोरावर लहान निवडणुका जिंकता येतील. इतके मोठे नेते आहेत त्यांनी उत्तर प्रदेशमधील २-४ जागांची जबाबदारी घेऊन जनतेतून निवडून आणण्याची घेतली तर त्यांना देशाचे मंत्री म्हणता येईल. गल्लीच्या राजकारणात दादागिरी करून यश मिळलं म्हणून राज्य आणि देशाच्या निवडणुकांचे निकाल आम्ही बदलू शकतो हे जास्त बोलणं आहे, असं म्हणत टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा