‘महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळे काही लोक गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत’

मुंबई : आमच्या हाती सूत्र द्या, मी ओबीसींचं आरक्षण परत आणून दाखवतो. जर असं करून दाखवलं नाही तर राजकीय संन्यास घेईल, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत. तर या वक्तव्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय.

‘देवेंद्र फडणवीस याचं विधान तुम्ही फार गांभीर्यानं घेतले. या आधीही त्यांनी स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असे म्हटलं होते’. तर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे, धनगर समाजाला सांगितले होते. मात्र यापैकी काही झालं नाही’, असा टोला थोरात यांनी लगावला होता.

यावर आता भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्वीट करून बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला आहे. ‘महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.’ असा घणाघात त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा