“काही लोक गांजा मारून काम करतात, त्यांची नार्कोटेस्ट करावी”

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होत. अखेर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर थेट निशाणा साधला होता. तसेच त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. भाजपा, पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांवर उद्धव ठाकर यांनी जोरदार हल्ला चढवला.

त्यानंतर भाजपाने देखील आक्रमक भूमिका घेतली व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच प्रमुख भाजपा नेत्यांकडून शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकासआघाडीवर जोरादार टीका सुरू झाली. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना उद्देशून एक खळबळजनक विधान केलं आहे.

महाराष्ट्रात किंवा देशात गांजाचं पीक जास्तच निर्माण झालं आहे, हे मला तर माहितीच नाही. काही लोक गांजा मारून काम करताना दिसत आहे. दसरा मेळव्यानंतर असला प्रकार मला वारंवार दिसतंय, विरोधी पक्ष बेतालपणे बोलतोय. या सर्वांची आता नार्कोटेस्ट केली पाहिजे. एनसीबीने असं बेताल बडबडणाऱ्यांची टेस्ट केली पाहिजे, की ते नेमकी काय मारतात का? त्यांना कुणी पुरवतं का? इतक्या बेधुंदपणे कुणी कारभार करू शकत नाही, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लागवला.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा