सोनाली कुलकर्णीने दिला गोड धक्का ; शेअर केले साखरपुड्याचे फोटो

अनेक चित्रपटांमधून आपल्या कलेची छाप पाडणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने काल आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. दुबईमध्ये राहणा-या कुणाल बेनोडेकर याच्याशी 2 फेब्रुवारीला सोनालीचा साखरपुडा झाला. याची अधिकृत घोषणा सोनालीने केली आहे.

Video – कोरोनाची लढाई लढणाऱ्यांना ‘या’ गाण्याद्वारे सलाम

गेले अनेक दिवस सोनाली कुलकर्णीच्या प्रेमप्रकरणाविषयी चर्चा सुरु होती. मात्र अखेर तिने तिच्या लाईफ पार्टनरविषयी माहिती दिली आहे. ‘आमचा 2 फेब्रुवारी 2020 ला साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं…आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या,’ अशी फेसबुक पोस्ट सोनालीने लिहिली आहे.

Loading...
काही काळापूर्वी कुणाल बेनोडेकर याच्याशी तिचं लग्न होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, कोणतीही तारीख सोनालीने जाहीर केली नव्हती. पण, फेब्रुवारी महिन्यातच तिचा साखरपुडा झाल्याची घोषणा तिने केली आहे.

 

View this post on Instagram

Before my birthday ends, I want to mark it by making a SPECIAL ANNOUNCEMENT!!! Introducing my fiancé Kunal Benodekar! @keno_bear आमचा ०२.०२.२०२० ला साखरपुडा झाला, आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं… आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या…!!! #sakharpuda #engaged #palindrome #02022020 #precovid #engagement #fiancé Thank you @yashkaklotar for capturing our moment!

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.