तब्बल 1200 किलोमीटर सायकलने प्रवास करून आला सोनू सुदला भेटायला; चप्पल न घातलेली पाहून सोनू झाला भावुक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनमध्ये लोकांना खूप मदत केली आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याची देवाप्रमाणेच पूजा करण्यास सुरुवात केली आहे. आता तर एका चाहत्यांने त्याला भेटण्यासाठी 1200 किमी सायकल चालवून मुंबईला पोहोचला आहे. या व्यक्तीने त्याच्या सायकलवर सोनू सूदचा एक मोठा फोटो लावला होता. बरेच हार आणि फुलं घेऊन हा व्यक्ती सोनू सूदकडे पोहोचला होता.

अभिनेता सोनू सूड सतत लोकांना मदत करत असतो. यामुळेच लोक त्याला भेटायला दूरवरून येत असतात. सोनू सूद या व्यक्तीला पाहताच तो खूप भावूक झाला. सायकलवर आलेल्या या व्यक्तीने चप्पलही घातलेली नव्हती. हे पाहून सोनू सूदने या व्यक्तीसाठी नवीन चप्पलची व्यवस्था केली.

सोनूची भेट घेतल्यानंतर या व्यक्तीने त्याच्या पायावर फुले अर्पण केली, पण इथे सोनू सूद याने स्वत: त्या चाहत्याला पुष्पहार घातला आणि म्हणाला की, “हे सर्व करण्याची गरज नाही.” सोनूने हात जोडून त्याचे स्वागत केले. सोनू सूदला भेटण्यासाठी लोक कैक किलोमीटरवरुन सतत येत असतात. यापूर्वी एका व्यक्तीने त्याला भेटण्यासाठी 700 किमीचा प्रवास केला होता.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा