पुन्हा मदतीला धावला सोनू सूद; काळजी करू नको म्हणत केली हरभजनसिंगची मदत  

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना काळात अनेक कामगार, मजुरांना त्यांच्या गावी, घरी पोहोचण्यासाठी मोलाची मदत केली. इतकंच नाही तर अनेक गरजूंची भूक भागवण्याचं कामही त्याने केलं आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा भासतोय. गरजू आणि गंभीर रुग्णांना ते वेळेत मिळवून देण्याचं काम सोनू सूद करतोय. अशावेळी सोनू सूदने भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजनसिंगचीही मदत केलीय.

हरभजनसिंग याने 12 मे रोजी कर्नाटकमधल्या बसप्पा हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीच्या उपचाराकरिता रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज असल्याचं ट्विट केलं. तसंच हरभजनसिंगने हॉस्पिटलचा पूर्ण पत्ता आपल्या ट्विटमध्ये मेन्शन केला. सोनूने हे ट्विट वाचून लगेच रिप्लाय केला. भज्जी, पोहोचवलं जाईल, असं म्हणत त्याने ते इंजेक्शन पोहोचवलं देखील…!

सोनू सूद सातत्याने अनेकांच्या मदतीला धावून जात असल्यामुळे अनेकजण त्यांना मदत मागतात. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या रोशनी बुराडे या तरुणीने ट्विट केलं, “माझे पप्पा कोरोना बाधित आहेत. त्यांना व्हेंटिलेटरची खूप गरज आहे. संपूर्ण नागपूरमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीये. सोनू सूद सर मला कृपया मदत करा. माझ्या पप्पांना वाचवा प्लिज. तुम्हीच मला मदत करु शकता.” यावर सोनू सूदने तात्काळ प्रतिसाद देत तुझ्या वडिलांना काहीही होणार नाही. एका तासात त्यांना व्हेंटिलेटर मिळेल”, असं ट्विट केलं होतं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा