‘लवकरच तो दिवस उगवेल’;संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 61 वा वाढदिवस आहे. कोरोना पार्श्वभूमी आणि राज्यातील पूरस्थितीमुळे वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अखंड साथ आणि अतुट नातं आहे. राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे. तो दिवस लवकरच उगवेल, असं संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे. प्रत्येकाला आपला कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री वाटने, हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. हे नेतृत्व दिर्घकाळ टिकेल. आणि या नेतृत्वाकडून राष्ट्रालाही भविष्यात आपेक्षा आहेत, असं माझं मत आहे.

मी पुन्हा एकदा अधोरिखित करतोय की, राष्ट्राला उद्धव ठाकरेंसारखा संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदूत्ववादी नेतृत्वाची गरज जर भविष्यात जर लागली तर ते नेतृत्व करण्यात सक्षम आहेत आणि ते करतील. याची मला खात्री आहे. या शुभेच्छा मी आज देतोय, असं खासदार संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा