लवकरच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी?

शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना देण्याच्या हालचालीना वेग आला आहे, लवकरच तसा निर्णय होणार आहे. थकबाकीदार शेतकरी व थकबाकीची माहिती जिल्ह्या-जिल्ह्यातून मागविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, असा आग्रह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धरला होता. आपली ही अट मान्य केल्यानेच आपण युतीसाठी तयार झालो, असे ठाकरे यांनी म्हटले होते. राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील 43 लाख 35 हजार शेतकऱ्यांना 18 हजार 235 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे.

आतापर्यंत दिलेल्या कर्जमाफीत मार्च, 2016 पर्यंत काढलेले कृषीकर्ज व थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आहे. आता 2016-2017 आणि 2018 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे कळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्य कारणांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.