“भारतनाना माफ करा, पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली”

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीला धुळ चारत भाजप उमेदवार विजयी झाला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालकेंच्या अकाली निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली होती. यात भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली होती तर भाजपकडून समाधान आवताडेंना उमेदवारी देण्यात आली होती.

निवडणूकीच्या या निकालावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत भारतनानांची माफी मागितली आहे. “भारतनाना माफ करा, पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

अमोल मिटकरींचे ट्वीट

भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले, असे ट्वीट अमोल मिटकरींनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.