Sourav Ganguly | सौरव गांगुलीला आता Z+ सुरक्षा, जाणून घ्या त्यामागचं कारण

Sourav Ganguly | टीम महाराष्ट्र देशा: पश्चिम बंगाल सरकारने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या सुरक्षितेमध्ये वाढ केली आहे. ममता बॅनर्जी सरकार दादांना आता Z+ सुरक्षा (Z+ security) प्रदान करणार आहे. नवीन सुरक्षा व्यवस्थेनुसार, गांगुलींसाठी आता आठ ते दहा पोलीस तैनात असणार. आधी त्यांच्या सुरक्षिततेसाठी तीन पोलीस हजर असायचे.

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांना यापूर्वी ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा होती. आता सरकारने गांगुलींची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बंगाल सरकारतर्फे त्यांना Z+ सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. दादाच्या सुरक्षेला काही धोका आहे? म्हणून ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे का? याबाबत अजून स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, सौरव गांगुली सध्या दिल्ली कॅपिटल्ससोबत प्रवास करत आहे. 21 मे रोजी ते कोलकत्ता येथे परतणार आहे. त्या दिवसापासून दादांना Z+ सुरक्षा लागू होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

सौरव गांगुली यापूर्वी केंद्र सरकारच्या जवळ होते. गांगुलींनी आपल्या पक्षात यावे, अशा ऑफरही सत्ताधाऱ्यांनी त्यांना केली होती. मात्र दादा यासाठी तयार नव्हते. त्यानंतर दादा आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये खटके उडल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यानंतर त्यांना बीसीसीआय अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले होते. आता सरकारने दादांना Z+ सुरक्षा प्रदान केल्यानंतर, हे नवे राजकीय समीकरण आहे का? अशा चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या