InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली?

- Advertisement -

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची निवड होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या तुलनेत गांगुलीचे पारडे जड मानले जात आहे. गांगुलीला पटेल यांच्यापेक्षा अधिक पसंती मिळत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बीसीसीआयला गांगुलीच्या रुपाने नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्‍यता आहे.

सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली, तर तो या पदावर 2020 पर्यंत कार्यरत राहील. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे नवे सचिव, तर अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होण्याची शक्‍यता आहे. बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी सोमवारी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.

Loading...

बीसीसीआयच्या 23 ऑक्‍टोबरला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध पार पडावी, या दृष्टीने रविवारी विविध राज्य संघटनांची अनौपचारिक बैठक मुंबईत झाली. या बैठकीत विविध नावांवर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय यांना सचिवपद आणि केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण सिंग धुमाळ यांच्या नावांबाबत संघटकांचे एकमत झाले आहे.

- Advertisement -

Loading...

जय हे गुजरात क्रिकेट संघटनेचे आणि अरुण सिंग हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आहेत. आसामच्या देबाजित सैकिया यांना संयुक्त सचिवपदासाठी उमेदवारी दिली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या नावाबाबत रात्री उशिरापर्यंत एकमत होऊ शकले नाही. गांगुली यांना लोढा समितीच्या नियमानुसार कार्यकाळाचा मुद्दा येत्या काही काळात अडचणीचा ठरू शकतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.