InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

प्रशासकीय समितीचं शासन संपुष्टात, सौरव गांगुली बीसीसीआयचा 39वा अध्यक्ष बनणार

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचा 33 महिन्यांचं शासन आज (23 ऑक्टोबर) संपुष्टात येणार आहे. त्यामुळे निवडून आलेले प्रतिनिधी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचा कारभार सांभाळणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आज बीसीसीआयचा नवा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारेल. यापुढे त्याची नवी टीमच बीसीसीआयसाठी निर्णय घेईल.

बीसीसीआयचे नवनियुक्त अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तुम्ही तुमचं काम आटोपा, असं न्यायमूर्ती एस ए बोबडे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने प्रशासकांच्या समितीला सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या शिफारशींच्या आधारावर बीसीसीआयमध्ये 2017 मध्ये प्रशासकीय समितीची स्थापना केली होती.

Loading...

भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला सौरव गांगुली बीसीसीआयचा 39वा अध्यक्ष असेल. त्याने अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रशासकीय समितीचं 33 महिन्यांचं शासन संपुष्टात येईल. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीची निवड एकमताने झाली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह बीसीसीआयचे सचिव असतील. उत्तराखंडचे महिम वर्मा नवे उपाध्यक्ष, केंद्री अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे धाकटे बंधू अरुण धूमल खजिनदार आणि केरळचे जयेश जॉर्ज संयुक्त सचिव म्हणून पदभार स्वीकारतील.

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.