Happy Birthday – टिपिकल साउथ सिनेमातील प्रभास झाला बाहुबली

दक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार प्रभास याचा आज (२३ ऑक्टोबर ) वाढदिवस…दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यावर त्यानं बॉलिवूडमध्येही नाव कमावलं. जाणून घेऊया प्रभासबद्दल काही गोष्टी…
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रभास ‘डार्लिंग’ या टोपणनावानं प्रसिद्ध आहे. त्याचे काही मित्र त्याला प्रेमाने प्रभा, पब्सी आणि मिस्टर परफेक्ट देखील म्हणतात.

मादाम तुसा म्युझियममध्ये मेणाचा पुतळा उभारला जाणारा प्रभास हा पहिला दाक्षिणात्य सुपरस्टार आहे.अभिनय क्षेत्रात करिअर करायचे असे प्रभासने कधी ठरवलेच नव्हते. त्याला हॉटेल व्यवसायिक बनायचे होते. तो स्वत: खवय्या असल्याने त्याला इतरांना खाऊ घालण्यात रस होता.’बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या चित्रपटांचे चित्रीकरण तब्बल ५ वर्ष सुरू होते. या दरम्यान प्रभासनं इतर कोणतीही कामं स्वीकारली नव्हती. त्यामुळे त्याला बरंच आर्थिक नुकसान सोसावं लागलं होतं.प्रभासने जरी अभिनय क्षेत्रात करिअर केले असले तरी तो इंजिनिअर आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे.

बाहुबलीच्या प्रचंड यशानंतर, आजघडीला देशातील ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ कोण असेल तर तो आहे प्रभास.प्रभास अत्यंत नम्र आहे आणि त्याचे राहणीमान अगदी साधे आहे.मी एक साधा कलाकार आहे, असंच तो नेहमी म्हणतो.भासला बाहुबलीच्या भूमिकेसाठी वजन बरंच वाढवावं लागलं. पिळदार शरीरयष्टीही कमवावी लागली.प्रभासच्या चाहत्यांमध्ये तरुणींची संख्या आधीपासूनच मोठी आहे. तब्बल सहा हजार मुलींनी त्याला लग्नासाठी मागणी घातली होती. पण, सिनेमावर लक्ष केंद्रीत करता यावं, यासाठी त्या सगळ्यांना प्रभासनं नम्रपणे नकार दिलाएका टिपिकल साउथ सिनेमातील प्रभासचा ‘अवतार’.. हा अभिनेता पुढे जाऊन बाहुबली होईल, अशी कल्पनाही कुणी केली नसेल.

Loading...

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.