InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

वाशीमच्या शेतकऱ्याने दोन एकरांवर केली दगडांची पेरणी

वाशीम – बी-बियाण्यांसाठी शेतकऱ्याने किडनी देण्याची तयारी दाखवल्याची घटना ताजी असतानाच आता मालेगाव तालुक्यातील वसारी येथील अरुण लादे या शेतकऱ्याने पेरणीसाठी पैसे नाहीत म्हणून चक्क दगडांची पेरणी केली आहे. एवढे दिवस वरुणराजाची प्रतीक्षा करणारा बळीराजा आता पेरणीच्या चिंतेने ग्रासलेला आहे. पाऊस पडला पण पेरायचं कसं आणि काय? हा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहिला आहे. दगडांची पेरणी करून शेतकरी अरुण लादे यांनी शासनावर आपला रोष व्यक्त केला आहे. आता तरी मुख्यमंत्री साहेबांना जाग यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दुर्दैवाची बाब म्हणजे, ज्या विदर्भात शेतकरी अरुण लादे यांच्यावर दगडांची पेरणी करण्याची वेळ आली तेथीलच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेही विदर्भाचेच आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न किती गंभीर झाले आहेत, हे ही घटना अधोरेखित करणारी आहेत.

.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply