शरद पवारांकडून अमित शहांना खास निमंत्रण; लवकरच अमित शहांचा पुणे दौरा

पुणे : मागील दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी विरोधकांची बैठक बोलावली असताना, त्याच दिवशी पवार शहांच्या भेटीला गेले. आता हे दोन नेते पुन्हा एकदा भेटण्याची शक्यता आहे.

यानंतर आता पुढील महिन्यात अमित शहा पुण्यात येत आहेत. शहा त्यांच्या एका नियोजित कार्यक्रमासाठी पुण्यात येणार आहेत. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात अमित शहा यांचा हा दौरा होणार आहे. त्यांचा एक पूर्वनियोजित कार्यक्रमात पुण्यात आहेत. याच दौऱ्यात शहांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट द्यावी असा आग्रह पवारांनी केल्याचं समजतं.

या सगळ्या गोष्टींची कल्पना असल्यानं पवारांनी शहांना जिल्ह्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं निमंत्रण दिलं. त्यावर शहांनी होकार दर्शवला. त्यामुळे पुढील महिन्यात पुन्हा एकदा पवार आणि शहांची भेट होण्याची दाट शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा