InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

प्रो-कबड्डी लीगच्या ५ व्या मोसमापूर्वी दबंग दिल्लीने केली मोठी घोषणा

डेहराडून | प्रो-कबड्डी लीगमधील दबंग दिल्ली संघाने १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान डेहराडून येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या स्पर्धेत डेहराडूनमधील १६ शालेय संघ सहभागी होणार आहेत.

ही स्पर्धा प्रो-कबड्डी लीगप्रमाणे मॅटवर खेळवली जाणार आहे. तसेच या स्पर्धेचे समालोचना सहीत थेट प्रेक्षपणही केले जाणार आहे.

कबड्डी खेळाचा तळगाळात प्रचार आणि प्रसार होण्यासाठी दबंग दिल्लीने या  स्पर्धेचे आयोजन केले आहे.

याची माहिती दबंग दिल्लीच्या व्यवस्थापनाने पत्रकारांशी बोलताना दिली.

या स्पर्धेतील अंतिम फेरीतल दोन संघांना पुढील काळात दबंग दिल्लीचा कर्णधार, उपकर्णधार आणि प्रशिक्षक संघाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यापूर्वी तामिळ थलायवाजने चिल्ड्रन्स कबड्डी लीग आणि कॉर्पोरेट कबड्डी फेस्टची घोषणा केली आहे.

त्यामुळे येत्या काळात भारतातील कबड्डी खेळाच्या वाढीस हातभार लागणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-तब्बल ७ वर्षांनी भारतीय फलंदाज कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी

-इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मिळणार ‘या’ तीन खेळाडूंना डच्चू?

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply