SSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम नोकरीची संधी आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC Recruitment) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 5369 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन,विभाग ग्रेड दोन, तीन, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅन्टीन, स्टोअर कीपर, कनिष्ठ लेखापाल, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम कुक, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर आणि सब एडिटर पदाच्या जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (SSC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (SSC Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/149-YLdpbPL7y1AHQabeirmIKvs83gOfw/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://ssc.nic.in/Registration/Home
महत्वाच्या बातम्या
- Coconut Water and Honey | नारळाच्या पाण्यामध्ये मध मिसळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
- Job Opportunity | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Weather Update | पुढील 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता, तर ‘या’ भागात येलो अलर्ट जारी
- Urfi Javed | “ढोंगीपणालाही मर्यादा असते हे सांगा या बाईला कोणीतरी”; उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं
- Aaditya Thackeray | “त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही, ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये जायचं”- आदित्य ठाकरे