SSC Recruitment | स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी बंपर भरती
टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारने काही दिवसांपुर्वीच मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करणार असल्याचे जाहीर केले आहे. तेव्हापासून सातत्याने देशभरातील तरूणांकडून एसएससीच्या भरती प्रक्रियेबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC देशभरात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचे काम करते. विविध विभागांतील पदांचा यामध्ये समावेश असतो. स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC यांच्यामार्फत कॉन्स्टेबल GD पदाच्या एकूण 24,369 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी अधिक माहिती मिळवण्यासाठी पदानुसार पात्रधारक इच्छुक उमेदवारांनी ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC यांच्यामार्फत विविध पदांच्या 24,369 जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 24,369 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये पुढील पदांचा समावेश आहे.
- कॉन्स्टेबल (सामान्य सेवा) पदाच्या सीमा सुरक्षा दलात १०४९७ जागा
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात १०० जागा
- केंद्रीय राखीव पोलीस दलात ८९११ जागा
- सीमा सशस्त्र दलात १२८४ जागा
- इंडो तिबेटन सीमा दलात १६१३ जागा
- आसाम रायफल्स मध्ये १६६७ जागा
- विशेष सुरक्षा दलात १०३ जागा
- अंमली पदार्थ नियंत्रण विभागात १६४ जागा
शैक्षणिक पात्रता
स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या या बंपर भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. या पदांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
nmk.co.in या अधिकृत वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार इच्छुक उमेदवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.
महत्वाच्या बातम्या
- Bachhu Kadu । “मला गुवाहाटीवरून परत यायचं होतं, पण…”; बच्चु कडूंचा मोठा खुलासा
- Bachhu Kadu । “आधी मला लोक विरूवाले आमदार म्हणायचे, मग भिडू, आता खोकेवाले…”; बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत
- Bacchu Kadu | “आजही मला ठाकरेंबद्दल आस्था पण…”; बच्चू कडू यांनी शिंदेंसोबत जाण्याचे सांगितले कारण
- Government Job Recruitment | भारतीय गुप्तचर विभाग IB यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Explained | शिंदे -फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्र कंगाल, गुजरात मालामाल! हे मोठे प्रकल्प केले दान
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.