एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा नाही, एसटी विलिनीकरणावर २२ डिसेंबरला होणार सुनावणी

मुंबई : गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. यानंतर एक महिना झाला तरी अजूनही हा संप मागे हटलेला नाही. कामावर हजर न राहणाऱ्या जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रूजू व्हावे. रूजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षी प्रभावाने कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तथापि, संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, असे कर्मचारी सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येईल, असे आश्वासन अनिल परब यांनी दिलय.

मात्र तरही कर्मचारी आंदोलनावर ठाम होते. यानंतर आज एसटीच्या विलिनीकरणाबाबत सोमवारी २० डिसेंबर २०२१ रोजी त्रिसदस्यीय समिती अहवाल सादर करणार होती. न्यायालयाने आज सुनावणीदरम्यान विलिनीकरणाच्या मागणीवरील सुनावणी २२ डिसेंबरला ठेवली आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांनी न्यायालयात बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन ४१ टक्क्यांची वाढ केली होती. परंतु विलिनीकरणाच्या मागणीवरुन कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्मचारी आंदोलन मागे घेण्याची शक्यता होती. परंतु न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. या प्रकरणावरील सुनावणी आता बुधवारी २२ डिसेंबरला दुपारी २ वाजता घेण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा