“शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरू”: विनायक मेटे

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज कुलाबा कफ परेड येथे जाऊन शिवस्मारकाच्या कार्यालयाची पाहणी केली. त्यावेळी त्या कार्यालयाची अवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कुलाब्यातील शिवस्मारकाच्या ऑफिस गळत असून त्याची खूप दुर्दशा झाली आहे. यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सरकारला इशारा दिला आहे. “शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण जबाबदार आहेत,” असा आरोपही मेटेंनी केला आहे.

“हे कार्यालय सामान्य प्रशासन विभागाच्या ताब्यात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या विभागाचे प्रमुख आहेत. मात्र, त्यांचच या कार्यालयाकडे दुर्लक्ष होत असल्याचं मेटे यांनी म्हटलं आहे. तसेच गेल्या दीड वर्षात आघाडी सरकारचा एकही नेता या ऑफिसची पाहणी करण्यासाठी फिरकला नाही. ऑफिसला गळती लागली आहे. पडझड सुरू आहे. कार्यालयात काहीच शिल्लक राहिलेलं नाही,” असं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा