स्टेट बँक ऑफ इंडियाच डेबिट कार्ड होणार हद्दपार- रजनीश कुमार

येत्या पाच वर्षांमध्ये डेबिट कार्ड बंद होणार आहे. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ आपले डेबिट कार्ड बंद करण्याचा विचार करत आहे.  एसबीआय बँकिग प्रणालीतून डेबिट कार्ड हद्दपार करण्याचा विचार करत आहे. देशातील बहुतांश एसबीआय ग्राहक डेबिट कार्डवर अवलंबून आहेत, मात्र तरीही बँकेने या निर्णयाची तयारी केली आहे. “डेबिट कार्ड हद्दपार करण्याचा आमचा इरादा आहे आणि आम्ही ते नक्कीच करु,” असं बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सांगितलं.

रजनीश कुमार म्हणाले की,  देशभरात सध्या सुमारे 90 कोटी डेबिट कार्ड आणि तीन कोटी क्रेडिट कार्ड आहेत. डेबिट कार्डलेस देश बनवण्यासाठी ‘योनो’ प्लॅटफॉर्मची भूमिका महत्त्वाची असेल. या ‘योनो’ प्लॅटफॉर्मद्वारे कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात किंवा कार्ड स्वाईप न करता खरेदी करता येऊ शकते.

एसबीआयच्या देशभरातील अनेक एटीएम्समध्ये ‘योनो’ सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेमुळे फक्त मोबाइलच्या साहाय्याने पैसे काढता येणे शक्य आहे. तसंच खरेदी-विक्रीचे व्यवहारही योनोच्या साहाय्याने करता सहज करता येऊ शकतात. तसंच योनोच्या मदतीने खरेदी विक्रीचे व्यवहारही केले जातात.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.